Bedhadak 2018 Marathi 720p WEB-DL 900mb
गुणवत्ता किंवा करिअर फक्त अकॅडॅमिक शिक्षणातच नसतं, ते कला आणि खेळांतही असतं. फक्त आपल्या शिक्षणव्यवस्थेने आणि मोठ्या प्रमाणावर समाजव्यवस्थेनेही कला-खेळांना एवढं दुर्लक्षित ठेवलंय की, त्यातलं निपुणत्व अजूनही करिअरच्या दृष्टिकोनातून लक्षात घेतलं जात नाही. उलट कला-खेळांच्या मागे लागून आपला पाल्य भरकटतोय, असंच पालकांना वाटतं. परिणामी छंद म्हणून नाच-गाणं किंवा खेळ ठीक आहे, पण त्यातली प्रगती अकॅडॅमिक शिक्षणाला पर्यायी ठरू शकत नाही, अशीच धारणा बहुतांशी आजही आहे... याच धारणेवर प्रहार करण्याचं काम 'बेधडक' हा सिनेमा करतो आणि पालकांचं, गावाचं, राज्याचं, देशाचं नाव मोठं करण्याचं काम अकॅडॅमिक शिक्षणात कमी असलेला खेळाडूही करू शकतो, हे दाखवून देतो.
अजय (गिरीश टावरे) आणि त्याच्या भावात (प्रसाद लिमये) हाच फरक असतो. अजयचा भाऊ अकॅडॅमिक शिक्षणात आघाडीवर, तर अजय बॉक्सिंगमध्ये. पण एका महाविद्यालयाचे प्राचार्य असलेल्या त्याच्या वडिलांना (गणेश यादव) ही तुलनाच मान्य नसते. आयुष्यात अकॅडॅमिक शिक्षणच खरं, असं मानून ते अजयवर सतत अन्याय करत राहतात. त्याच्या बॉक्सिंगमधल्या यशाचं कौतुक सोडाच, पण बारावीच्या पूर्वपरीक्षेत परीक्षेत तो नापास झाला म्हणून, शंभर टक्के निकाल लागावा यासाठी त्याला महाविद्यालयातून काढूनच टाकतात... नव्हे एका क्षणी घरातूनही हाकलून लावतात.
अजय घरातून बाहेर पडल्यावर पुढे नेमकं काय होतं, अजयचा संघर्ष यशस्वी होतो का, तो स्वत:ला सिद्ध करतो का आणि महत्त्वाचं म्हणजे, आपल्या शिक्षणव्यवस्थेतील खोट्या आदर्शांचा बुरखा फाडतो का?... हे कळायला हवं असेल, तर त्यासाठी हा सिनेमाच पाहायला हवा...
'बेधडक ' सिनेमाची कथा-मांडणी खूपच साधी आणि सोपी आहे. त्यामुळे धक्कातंत्र किंवा उत्कंठा ताणून धरण्याच्या पातळीवर हा सिनेमा तग धरत नाही. प्रेक्षक आधीच अंदाज बांधून मोकळे होतात. साहजिकच प्रेक्षकांना बांधून ठेवण्याच्या कसोटीवर सिनेमा उतरत नाही.
सिनेमात गणेश यादव, अशोक समर्थ (अजयचे बॉक्सिंगचे प्रिशक्षक), अनंत जोग असे तगडे कलाकार आहेत आणि त्यांनी आपली भूमिका अतिशय चोखपणे बजावली आहे. अजयच्या आईच्या भूमिकेतील स्नेहा रायकर आणि प्रेयसीच्या भूमिकेतील नम्रता गायकवाड यांनीही आपल्या भूमिका नीट निभावल्यात. मात्र, अजय या नायकाच्या भूमिकेतील गिरीश टावरे बॉक्सरच्या शरीरयष्टीच्या दृष्टिकोनातून चोख असला तरी, अभिनयात मार खातो. कित्येकदा तो अवघडलेला वाटतो.
सिनेमातील तांत्रिक बाबी बेतास बात आहेत. सिनेमातली गाणीही ठाकठीक आहेत. त्यांचा फार प्रभाव पडत नाही. उलट पार्टीतलं एक गाणं त्याचे शब्द आणि संगीतामुळे खटकतं. कारण कुठल्याही गाण्यासाठी पार्श्वभूमीही तशीच लागते. सोफिस्टिकेटेड पार्श्वभूमीवर उडत्या चालीचं लोकधाटीचं गाणं कसं चालेल? परंतु, हा सिनेमा बनवताना फार काही विचार केलेला नाही हे जाणवतं!
IMDB Ratings: N/A
Genres: Action, Drama, Sport
Language: Marathi
Quality: 720p WEB-DL
Size: 928mb
Director: Santosh Manjrekhar
Writer: Govind Tukaram Taware
Stars: Girish Taware, Ganesh Yadav, Ashok Samarth
https://we.tl/b-mHuVKQmrmjhttps://sharer.pw/file/g62wuNXg9RK
0 comments: