Showing posts with label Marathi Comedy Movies. Show all posts
Showing posts with label Marathi Comedy Movies. Show all posts

Pushpak Vimaan

Pushpak Vimaan




IMDB Ratings: 8.1/10
Genres: Drama
Language: Marathi
Quality: pDVDRip
Size: 699mb
Director: Vaibhav R. Chinchalkar
Writer: Vaibhav R. Chinchalkar
Stars: Subodh Bhave, Mohan Joshi, Gouri Mahajan
Movie Plot: An 83-year-old man, Tatya, an ardent devotee of Saint Tukaram firmly believes the age-old folklore, which says that the saint boarded the Pushpak Vimaan and set off to heaven, to be true. He also harbors the dream of flying in Tukaram’s mystical vehicle. The movie, with a touch of humor, showcases the emotions shared between a grandfather and a grandson.

स्वप्नं म्हणजे, माणसाच्या अपुऱ्या राहिलेल्या इच्छा-आकांक्षांची पोतडी. ही पोतडी सहसा कधी रिकामी होत नाही... अन् तरीही माणून स्वप्नांमागे धावत असतो. कारण अनेकदा स्वप्नंच असतात प्रत्येकाच्या जगण्यामागची जिजीविषा. या स्वप्नांच्या आधारेच प्रत्येकजण चिवट आशा बाळगून असतो. 

... असंच एक स्वप्न आहे 'पुष्पक विमान' चित्रपटातील तात्यांचं(मोहन जोशी). तात्या जळगावातील मोठे कीर्तनकार. तुकारामांना सदेह वैकुंठाला घेऊन जाणाऱ्या पुष्पक विमानाचं कीर्तन म्हणजे तात्यांचा हुकमी एक्का. तात्यांनी हे कीर्तन सुरू केलं की, उपस्थित श्रोते त्यात रंगून जातच, परंतु पुष्पक विमानाचं वर्णन करता करता तात्यांची स्वत:चीच अशी ब्रह्मानंदी टाळी लागायची की त्यांच्या चित्तचक्षुंसमोर प्रत्यक्ष पुष्पकविमानच अवतरत असे. प्रत्यक्ष विष्णुने तुकारामांना आणण्यासाठी पाठवलेले हे पुष्पक विमान म्हणजे, तात्यांच्या भावभूमीतलं अंतिम सत्य जणू. त्यामुळेच त्यांचा नातू विलास (सुबोध भावे)ने कितीही सांगितलं की, विमानाचा शोध राइटबंधुनी लावला, तरी ते त्यांच्या डोक्यात कधीच शिरत नाही. 

पुष्पक विमानातून तुकारामांचं सदेह वैकुंठाला जाणं, या मिथकाशी तात्या एवढे एकरूप होऊन जातात, की एकदा मुंबईला आलेल्या तात्यांना विलास जेव्हा आकाशातून उडणारं खरंखुरं विमान दाखवतो, तेव्हा त्यांना ते विष्णुचं पुष्पक विमानच वाटतं आणि सतत त्याचंच चिंतन केल्यामुळे तुकाराम आपल्याला पुष्पक विमानात बोलावत आहेत, असे आभास त्यांना व्हायला लागतात... मग सुरू होतो तात्यांचा पुष्पक विमानात बसण्याचा धोशा. 

तात्यांची ही स्वप्नपूर्ती होते का? विलास त्यांना पुष्पकविमानाची सैर घडवतो का? या प्रश्नांच्या उत्तरपूर्तीसाठी तुम्हाला सिनेमाच बघायला हवा आणि सिनेमा तुमचा वेळ कारणी लावेल एवढं नक्की! तरीही कथेचा मूळ जीवच बचक्याएवढा असल्यामुळे सिनेमात घडत फारसं काहीच नाही. मधे मधे सिनेमा कंटाळवाणा होतो, पण कीर्तनवजा गाण्यांनी ही उणीव भरुन काढलेली आहे.


खरंतर सिनेमाला दिलेली ट्रीटमेंट छान आहे. सिनेमातल्या पात्रांना आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वांना-संवादांना दिलेली अर्कचित्रात्मक शैली सुरेख आहे. पण केवळ याच्यावर सिनेमा तारला जाऊ शकत नाही. सिनेमातील तांत्रिक बाजू कितीही चांगल्या असल्या, तरी सिनेमाला एक बांधीव कथा लागतेच आणि त्या कथेचा जीव अगदी लहान असून चालत नाही. अन्यथा दिग्दर्शकाला खेळायला पुरेसा अवकाश मिळत नाही. 'पुष्पक विमान'मध्ये नेमकं असंच झालंय. सिनेमाचे मुख्य नायक तात्या आहेत आणि त्यांच्या स्वप्नाभोवतीच सिनेमा फिरतो. परंतु कथानक आणि त्यातील पात्रांविषयी जी आश्वासकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण व्हायला हवी, ती निर्माण होत नाही. परिणामी सिनेमाचा आशय प्रेक्षकांच्या थेट हृदयात उतरत नाही, किंबहुना तो खूप भाबडा वाटतो. आज ग्रामीण भाग कितीही मागासलेला असला, तरी त्याला विमान ठाऊक असतंच. आजच्या काळात तर हवेतून उडणारं विमान ठाऊक नसलेला माणूस सापडणं विरळाच. या पार्श्वभूमीवर तात्यांना विमान ठाऊक नाही, हे सत्य पचवणं प्रेक्षकांना जरा कठीणच जाईल. 

मात्र भाबडे, तरी काहीसे डामरट स्वभावाचे तात्या, मोहन जोशीनी ज्या ताकदीने साकारलेत, त्यासाठी त्यांना शंभराहून अधिक गुण द्यावे लागतील. मुंबईला गेलेल्या विलासची वाट पाहणारे तात्या, तो आल्यावर डोळ्यांत चमक आलेले तात्या, कोकणातल्या नातसुनेला फणसावरुन सतत टोचून बोलणारे इरसाल तात्या, अगदी तुकोबाच्या भेटीसाठी आणि पुष्पक विमानात बसण्यासाठी आतुर झालेले तात्या... या तात्यांसाठी जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही. सिनेमातील इतर पात्रंही आपापलं काम चोख करतात. सुबोधच्या भूमिकेला तसा फार स्कोपच नाही, त्यामुळे विलासचं पात्र तो सहज साकारुन जाते. त्याच्या बायकोच्या, स्मिताच्या भूमिकेत गौरी महाजनही ठीक, फिरोजच्या भूमिकेतील सुयश झुंजुरकेही मस्त. विशेष म्हणजे तात्यांची, गावाकडे त्यांना जेवण घालणारी शेजारीणही फर्मास. गायक राहुल देशपांडे तुकोबांच्या भूमिकेत भेटतो. 

या सिनेमातली गाणी ही चित्रपटाची जमेची बाजू आहे. त्यांचं थोडं बळ 'पुष्पक विमान'ला मिळू शकतं! 




https://9xupload.me/fwro1hqr0hg4http://www.indishare.me/4s1tyxaofedghttps://clicknupload.org/trkrglmrqtk8https://openload.co/f/kV43czFoRJ4/Pushpak_Vimaan_2018_Marathi_www.9xmovies.org_pDVDRip_x264_700MB.mkvhttps://9xplay.live/6k1cj6wdfi1jhttps://bdupload.info/yr8qlvbaq4lohttps://uptobox.com/nf3bxtziimhuhttps://hubfiles.ws/cf780b309fb6526ehttps://userscloud.com/mu3zgfhn3kekhttps://mirrorace.com/m/1sykthttps://uploadbaz.net/jbt8g5u9dlut

सायकल-Marathi Comedy Movie

सायकल-Marathi Comedy Movie




MDB Ratings: 8.9/10
Genres: Comedy
Language: Marathi
Quality: 720p HDTV
Size: 695mb
Director: Prakash Kunte
Writer: Aditi Moghe
Stars: Hrishikesh Joshi, Priyadarshan Jadhav, Bhalchandra Kadam
Movie Plot: A post-Independence era story, Cycle is about ‘Keshav”s intense love for his cycle which gets stolen by two thieves. Will Keshav ever find his cycle back?

एखाद्या व्यक्तीचा 'चांगुलपणा' हा अनेकदा इतरांच्या नजरेत 'मूर्खपणा' किंवा 'बावळटपणा' असतो. कारण त्यांच्या लेखी या चांगुलपणातून हाती काही लागत नाही, उलट झालंच तर स्वत:चं नुकसानच होतं. आताच्या काळात तर हा समज खरा ठरण्याचीच शक्यता अधिक. कारण आजकाल कुठलाही व्यवहार निव्वळ भावनिक पातळीवर होत नाही नि तसा दाखवण्याचा प्रयत्न केला, तर तो नक्की कालबाह्य वाटतो. मात्र एक काळ खरंच असा होता, जेव्हा कुठल्याही मानवी व्यवहारांत प्रेम, आपुलकी, जिव्हाळा या शब्दांना महत्त्व होतं आणि त्या बळावर कुटुंब-गाव सुखेनैव नांदत होतं. बहुदा यामुळेच 'सायकल' सिनेमाला १९५२च्या काळाची पार्श्वभूमी आहे. 


एखाद्या कथेचा जीव अगदीच लहान असतो. मात्र त्या कथेची मांडणी इतकी साधी-सोपी, तरल आणि लोभस असते, की आपण तिच्या प्रेमातच पडतो. 'सायकल' सिनेमा पाहताना अगदी असं होतं. सिनेमाची कथा, त्यातील पात्रं, त्यातला परिसर आणि त्यातील भावबंध.. यांच्या आपण प्रेमात पडतो. कारण प्रत्येक गोष्ट जेवढी नैसर्गिक आणि सहज ठेवता येईल, तेवढी लेखक-दिग्दर्शकाने ठेवली आहे. मुळात या सिनेमाने एक सुरेख लय पकडली आहे. ही लय निर्मळ आणि निर्मम मानवी जगण्याची आहे. 


ही गोष्ट आहे केशवदादा (हृषीकेश जोशी) आणि त्याच्या सायकलची. ही सायकल साधीसुधी नाही, तर ती ऐतिहासिक मूल्य असलेली आहे. त्याला ती त्याच्या आजोबांनी दिलेली आहे आणि त्याच्या आजोबांना ती एका ब्रिटिश अधिकाऱ्याने, त्यांच्यावर खूश होऊन दिलेली असते. साहजिकच ही सायकल म्हणजे केशवदादाचा प्राणच. एकवेळ तो आपलं काळीज काढून देईल, पण सायकलला कुणाला हात लावून देणार नाही. अशी ही सायकल एक दिवस चोरीला जाते. गावातले सगळेजण रात्री संगीत नाटक पाहायला गेलेले असताना गजा आणि मंग्या (भाऊ कदम, प्रियदर्शन जाधव) हे दोन चोर गावात शिरतात आणि एका गावकऱ्याच्या वाड्यात चोरी करून जाताना कुत्रे पाठी लागले म्हणून केशवदादाच्या सायकलवर बसून पोबारा करतात. गावकरी घरी परतल्यावर वाड्यावर चोरी झाल्याचं उघड होतंच, परंतु सोबत केशवदादाची सायकलही चोरीला गेल्याचं समजतं आणि अख्खा गाव चोरीला गेलेल्या दागिन्यांऐवजी सायकलची खबरबात काढायला केशवदादाच्या घरी जमतो. कारण केशवदादा आणि त्याचं सायकलप्रेम जगजाहीर असतं. 


काय होतं या सायकलचं आणि केशवदादाचं पुढे? ती केशवदादाला सापडते का? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील… तर त्यांच्या उत्तरांसाठी हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहायला हवा. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं तर मिळतीलच… पण एखाद्याच्या वृत्तीतील चांगुलपणाचा प्रवास कसा होतो आणि तो चांगुलपणा एखाद्या दुष्प्रवृत्तीच्या व्यक्तींनाही कधी कधी बदलण्यास कसा भाग पाडतो, तेही उमजेल.



जगण्या-वागण्यातली निरागसता आज हरवत चालली आहे… आणि तीच या सिनेमात नेमकी पकडण्यात आली आहे. केशवदादा, त्याची बायको जयश्री (दीप्ती लेले), त्यांची छोटी मुलगी मृण्मयी (मैथिली पटवर्धन), टपरीचालक श्याम(अभिजीत चव्हाण), सावकार (विद्याधर जोशी), दोन्ही चोर आणि सायकल चोरीला गेल्यावर ती ज्या-ज्या गावात जाते, त्या गावात चोरांना भेटणारी सगळी माणसं निरागस आहेत. हा निरागसपणा त्या सगळ्यांनी अभिनयात एवढा नेमका पकडलाय… की कुणीही त्यांच्या प्रेमात पडावं. अर्थात त्यासाठी लेखक-दिग्दर्शकाने वापरलेली कोकणाची पार्श्वभूमीही तेवढीच महत्त्वाची आहे. कारण कोकणचं नैसर्गिक समृद्धपण तिथल्या माणसांतही उतरलेलं आहे. 


सिनेमाच्या बाकीच्या सगळ्याच तांत्रिक बाजूही उत्तम आहेत. विशेषत: सिनेमातील चित्रचौकटी मजा आणतात. संगीतही आशयाला एकदम पूरक आहे. खूप दिवसांनी एक चांगला सिनेमा आलेला आहे. जगण्यासाठीची आश्वासकता पेरणारा हा सिनेमा आहे! 
.................................. 



निर्मिती संस्था : वायकॉम १८ मोशन पिक्चर्स आणि हॅपी माइंड प्रॉडक्शन 


कथा-पटकथा-संवाद : अदिती मोघे 


दिग्दर्शक : प्रशांत कुंटे 


छायाचित्रण : अमलेंदु चौधरी 


संगीत : आदित्य बेडेकर 


कलाकार : हृषीकेश जोशी, भाऊ कदम, प्रियदर्शन जाधव, दीप्ती लेले, संदेश कुलकर्णी, विद्याधर जोशी, अभिजीत चव्हाण, समीर खांडेकर, मैथिली पटवर्धन