Hampi 2017 Marathi 720p WEB-DL 750mb

इब्राहिम अफगाण

पंचवीसेक वर्षांची एक तरुणी हंपीला येते. तिचे आईवडिल घटस्फोट घेत असल्याने ती अस्वस्थ आहे. त्यामुळे तिचा प्रेमावरचा विश्वासच उडाला आहे. खरे प्रेम नाहीच असं ती म्हणते. मग तेथे तिला अर्थातच एक तरुण भेटतो आणि शेवटी तिला खऱ्या प्रेमाचा साक्षात्कार होतो.

हे आहे चित्रपटाचे कथासूत्र. कथेचा परीघ आकर्षक आहे, आव्हानात्मक आहे आणि हंपीसारख्या सुंदर पार्श्वभूमीवर घडत असल्याने कुतूहल वाढवणारा आहे. कारण, उत्तम चित्रपट, उत्क़ृष्ट कथा दुःखाचं निवारण करतात. त्यातील पात्रं या दुःखनिवारणाच्या प्रक्रियेतून जातात आणि जीवनाचा नवा दृष्टीकोन प्राप्त करतात. चित्रपटातून या पात्रांच्या माध्यमातून दर्शकही या प्रवासात सहभागी होतात आणि तेही तो नवा दृष्टीकोन मिळवतात आणि त्यांच्याही दुःखाचं निवारण होतं.

हे होण्यासाठी प्रारंभाच्या एका बिंदूपासून शेवटच्या बिंदूपर्यंतचा पात्राचा प्रवास जितका महत्त्वाचा तितकाच महत्त्वाचा त्याच्यासोबत होणारा प्रेक्षकांचा प्रवासदेखील. त्यासाठी पात्रांची रचना पटणारी, ठोस वाटायला हवी. त्या पात्राच्या दुःखाशी प्रेक्षकाने एकरूप व्हायला हवं. आणि ते साध्य करण्यासाठी ते दुःखही अस्सल हवं. खोटे दुःख मनाला भिडत नाही. ते सत्य असण्याची गरज नाही, ते प्रामाणिक आणि खरं मात्र असायला हवं. त्या गोष्टीच्या अभावामुळे एरव्ही नेहमीच भावनिक विरेचनाद्वारे आवडू शकणारे अनेक घटक असूनही हंपी अपुरा, वरवरचा आणि कृत्रिम वाटतो.


मानववंशशास्त्रात पदवी प्राप्त केलेली, उत्तम कथ्थक करणारी, हॉट पँट घालून बॉयकट केलेली आणि पुलंच्या आवाजातील बोरकरांची कविता ऐकणारी ईशा आईवडिलांच्या घटस्फोटामुळे अस्वस्थ व्हायला ती काही शाळकरी मुलगी नाही. प्रेमावरचा विश्वास उडाला आहे, हे मान्य करायचं तर इतक्या आयुष्यात तिचा प्रेमभावनेशी सामना झाला नाही असं मानणं कठीण आहे. बोरकरांसारख्या कवीच्या कविता का वाचते याचेही आकलन होत नाही. तीच गत अन्य पात्रांची. तिला भेटणारा कबीर हा आर्किटेक्ट आहे पण तो हिप्पीसारखा हंपीत फोटो काढत राहतोय. तोही दुर्गा भागवतांची पुस्तकं वाचतो. तसेच तिला गावात घेऊन येणारा रिक्षावाला तथा गाईड या चित्रपटात का आहे असा प्रश्न पडतो. कारण तो थोडी कॉमेडी शिंपडून भरपूर माहिती देण्यापलीकडे कथेत कोणतीही भर घालत नाही. ईशा सोडून बाकी कोणीही तोंड उघडलं की विकीपिडीया आणि ओशोच बाहेर पडतं. त्यामुळे कोणी बोलायला लागले की आता पाच मिनिटं तरी ज्ञान पाजळणार हे उघडच होतं. एकेकाळी लोक जसे हिप्पी सारखे राहायचे, तसे ते हंपीत राहतात. चित्रपटाचं नाव हंपी आहे, मात्र कथेचा आणि हंपी गावाचा तसा जैविक संबंध घडून येत नाही.

मात्र या पैकी अनेक दोषांची भरपाई अमलेंदूच्या कॅमेऱ्याने केली आहे. त्यातील छायाचित्रण बघण्यासाठी चित्रपट पाहायला जावं अशा प्रकारे त्याने नैसर्गिक उजेडाच्या साह्याने आणि मॅजिक लाईट मध्ये सगळे दोष विसरायला लावणारी फोटोग्राफी केली आहे.
IMDB Ratings: 8.0/10
Genres: Romance
Language: Marathi
Quality: 720p WEB-DL
Size: 757mb
Director: Prakash Kunte
Writer: Aditi Moghe
Stars: Priyadarshan Jadhav, Chhaya Kadam, Sonalee Kulkarni
Movie Plot: When Isha, sets out to Hampi to re-discover herself, she meets a myriad of people, including Kabir who helps her find happiness in the little things. Together they go through life-changing events, while their friendship blossoms into something more beautiful.
.


Similar Videos

0 comments: